पेठांची पुनर्रचना सुमारे १९७० चे आसपास झाली.

उदा. तोवर पुणे ३० हा विभाग नव्हता. सगळी सदाशिव पेठ पुणे २ मध्ये येत असे. सदाशिव पेठेची पूर्वेकडची हद्द तेव्हा भाऊ महाराज बोळ ही होती. स. प. महाविद्यालयातले पोस्ट सुरू झाले तेव्हा पुणे ३० झाले त्यात सदाशिव पेठ आली. सदाशिव पेठेची पूर्व हद्द तेव्हा बाजीराव रस्त्यापर्यंतच ठरवली गेली आणि बाजीराव रस्ता आणि भाऊ महाराज बोळादरम्यानचा उरलेला सर्व भाग शुक्रवार पेठेला जोडला गेला. त्यामुळे त्यानंतर जर भाऊ महाराज बोळातून पाहिले तर एका बाजूला १ शुक्रवार २ शुक्रवार असे पत्ते तर दुसऱ्या बाजूला १४०० शुक्रवार १४०१ शुक्रवार असे पत्ते दिसतील. असे अनेक पेठांच्या बाबतीत घडले असेल. (नक्की माहीत नाही. ) ज्याला वरील हकीगत माहीत नाही त्याला अशा पत्त्यांचे तर्कशास्त्र उलगडणे शक्य नाही. (ज्यांचे पत्ते वरील कारणाने बदलले त्यांच्याव्यतिरिक्त फार थोडे लोक हे समजून घेण्याच्या फंदात पडतात.) त्यामुळे गोंधळात भर पडण्याची शक्यता अधिक!

(चू. भू. द्या. घ्या.)