रे रोड, क्रॉफर्ड मार्केट, सायन सर्कल, चर्नी रोड, पोर्तुगीज चर्च यांना
कुणीतरी आणि कधीतरी अनुक्रमे बॅरिस्टर नाथ पै मार्ग, फुले मंडई, महाराणी
लक्ष्मीबाई चौक, राजा राम मोहन रॉय स्टेशन, प्रबोधनकार कै.केशव सीताराम
ठाकरे चर्च असे म्हणेल?
वंशपरंपरागत मुंबईकर सायन सर्कलला मरेस्तोवर सायन सर्कलच म्हणणार, कधीही चुकूनसुद्धा महाराणी लक्ष्मीबाई चौक म्हणणार नाहीत हे मान्य. परंतु नवोदित मुंबईकरांना ('इमिग्रंटांना') त्या चौकाला 'सायन सर्कल' म्हणतात हे कळण्यापूर्वी 'राणी लक्ष्मी चौक' हे त्याचे अर्वाचीन अधिकृत नाव आहे हे (बेस्टकृपेने) कळते.