लोक जेथे राहतात तो पत्त ते रोज आपसूकच 'शोधत' असतात. म्हणजे तो शोधणे वगैरे नकरताच त्यांना तो सापडत असतो. त्यामुळे तो शोधण्याला काय काय करावे लागेल ह्यांची त्यांना कल्पना नसते. एखाद्या ठिकाणचा पत्ता तिथे राहणाऱ्यापेक्षा तो पत्त शोधण्याचा अनुभव असणारा माणूसच जास्त बरोबर सांगू शकेल असे मला वाटते.
असाच एक आणखी प्रश्न - पुण्यात लॉजेस कुठली चांगली आहेत? आता पुण्यात राहणाऱ्याला ही माहिती असण्याची शक्यता कमी. बाहेरून येऊन लॉजमध्य राहणाऱ्याला जास्त बरोबर माहिती असणार तसेच पत्त्याच्या बाबतीत.