एक वाईट म्हणजे कुठलाही बादरायण संबंध जोडून प्रत्येक वाईट गोष्टीचा टाका ब्राह्नणांपर्यंत भिडवायची वृत्ती. आता बाईवर अन्याय भारतात सर्व पुरुषांनी केला आहे. कित्येक रजपूत जमातीत मुलगी झाली की मारून टाकायची प्रथा होती. भारतात काय सर्व जगात शारिरिक ताकद जास्त असल्याने पुरुष बाईवर सत्ता गाजवायचे. मुसलमान लोकांचे तत्त्वज्ञान वाचा. कुराणात बाईला आजही नीच दर्जा दिलेला आहे.
पण ह्या लेखिकेला इथेही ब्राह्मणच जबाबदार असल्याचे जाणवते.
दुसरी जास्त वाईट गोष्ट म्हणजे ब्राह्मणांनाच शिव्या आहेत ना? मग चुकीचे असले तरी छापा आणि आपली पुरोगामी प्रतिमा अधिकच उजळ करा अशी या वर्तमानपत्रांची वृत्ती. एकतर ब्राह्मण अल्पसंख्य, तशात त्यातील अनेकांना आपल्या पूर्वजांनी केलेल्या खऱ्या खोट्या अत्याचारांमुळे आलेला न्यूनगंड/अपराधी पणाचा गंड. त्यामुळे कुणी प्रत्युत्तर शाब्दिक वा अन्य प्रकारे देणार नाही ह्याची खात्री त्यामुळे हे प्रकार वाढत चालले आहेत.
लोकशाहीत एखाद्या गटात किती टाळकी आहेत ह्यावर त्या गटाचे सामर्थ्य ठरते. तिथे तर ब्राह्मण मार खाणार. निदान आर्थिक सामर्थ्य वापरुन एक प्रबळ लॉबी बनवली तर असल्या गोष्टींना आळ बसेल कदाचित्.