असं मत का बनलं ते जाणून घेणं महत्वाचं आहे. विनयच्या बॉस चं मत काही जन्मत: तसं नव्हतं.. ते बनलं.. नंतर.. हळूहळू...
अर्थात यामध्ये जर पुरेसा वेळ तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत नसाल तर असे मत बनताना काही इतरच (म्हणजे दुसरेच) फॅक्टर महत्वाचे ठरतात.
म्हणजे विनय पहिल्यांदा जर एका १५ मिनिटांच्या मीटींग ला भेटला व त्याचा किंचित जुनासा शर्ट वा बसल्यामुळे हळू आलेला आवाज यामुळे जर तो एकदा शामळू या कॅटॅगरीत बॉसच्या मते बसला, की मग ते मत बदलणे अवघड जाते. (प्रत्यक्षात कामाला तो एकदम ’वाघ’ असू शकतो.. तरिही... )