शिवाजी रस्ता हे सुद्धा व्यक्तिनामानेच ओळखले जातात. मात्र त्यांच्या बांधणीचा संस्था, देणगी इ. गोष्टीशी काय संबंध आहे याबाबत अज्ञानी आहे.

शिवाजी रस्ता हा शिवाजीनगर स्टेशनपासून निघून शिवाजीच्या स्मरणार्थ स्थापिलेल्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी हायस्कूलवरून, शिवाजी जिथे राहत होता त्या लाल महालाकडे जातो. तिथेच शिवाजीच्या आईच्या नावाचे जिजामाता उद्यान आहे, आणि जवळच जिजाबाईने बांधलेले कसबा गणपतीचे मंदिर.  सच्च्या पुणेकराला ही सर्व माहिती लहानपणीच त्याच्या आईकडून(कदाचित मम्मीकडून नसेल!)  बाळकडू म्हणून मिळालेली असते.

आता प्रतिसादकर्त्याचे अज्ञान दूर झाले असेल अशी अपेक्षा आहे.