किचन एका पेठेत आणि घर दुसऱ्या पेठेत असणे यात आश्चर्यकारक काय आहे? घराची पुढील बाजू एका पेठेत आणि मागची बाजू दुसऱ्या पेठेत असेल तर हे सहज शक्य आहे. पेठांची सरहद्द ही साधारणपणे एखादा रस्ता, चौक, पूल, नदी किंवा नाला असते. जेव्हा रस्ता असेल तेव्हा, रस्त्याच्या डाव्या बाजूला एक पेठ आणि उजव्या बाजूला दुसरी पेठ असणारच.  सौराष्ट्रात तर काही रेल्वे स्टेशनच्या एका फाटकातून बाहेर पडले तर एक गाव आणि विरुद्ध बाजूकडून बाहेर पडले की दुसरे गाव लागते. मुंबईतील विले-पार्ले ही अशीच दोन गावे होती. वसई रोड स्टेशनातून बाहेर पडले की वसई रोड नावाचे गाव लागत नाही तर वेगळेच गाव लागते(नाव आत्ता आठवत नाही-आठवले की लिहीन, तोपर्यंत कुणाला माहीत असल्यास सांगावे.)  भारत-पाकिस्तानच्या सरहद्दीवर अनेक गावात अर्धे शेत एका देशात आणि बाकीचे दुसऱ्या, अशी स्थिती असते.