काही वर्षे जातील आणि बीईएस्टी परत जुनी नावे व्यवहारात आणेल.
सांगवत नाही.
फारा वर्षांपूर्वी, सायन सर्कल किंवा एकंदरीतच शीव विभागाशी काहीही संबंध नसताना (आणि त्यामुळेच सायन सर्कलचा राणी लक्ष्मी चौकाशी संबंध तर सोडाच, पण शीवमध्ये सायन सर्कल या नावाचे एखादे ठिकाण आहे याचीही कल्पना नसताना) आणि मुंबईच्या दुसऱ्याच कोणत्यातरी भागातून तिसऱ्याच कोणत्यातरी भागात जाण्याच्या प्रयत्नात असताना, इच्छित बस मुळात सायन सर्कलवरून सुटत असल्याकारणाने बेस्टकृपेने राणी लक्ष्मी चौक नावाचे एक बसस्थानक बृहन्मुंबईत कोठे तरी आहे हे सत्य मला उमगले. (तपशील निश्चित आठवत नाहीत, परंतु अंधेरी स्थानकावरून सीप्झला जाण्याकरता बहुधा ३३६ क्रमांकाच्या राणी लक्ष्मी चौक ते सीप्झ मार्गे अंधेरी स्थानक पूर्व या बसच्या प्रतीक्षेत होतो असे वाटते.) त्यानंतर बऱ्याच वर्षांनी १. सायन सर्कल नावाचे एक ठिकाण मुंबईत शीव विभागात आहे, आणि २. सायन सर्कल म्हणजेच राणी लक्ष्मी चौक ही दोन तथ्ये माहीत पडली.
आता राणी लक्ष्मी चौक नावाचे एक बसस्थानक बृहन्मुंबईत कोठे तरी आहे ही गोष्ट मला प्रथम कळली त्या घटनेला आज किमान वीस वर्षे उलटून गेली आहेत. त्याआधी किती वर्षांपूर्वी 'सायन सर्कल'करिता 'राणी लक्ष्मी चौक' अशा पाट्या बेस्टने लावावयास सुरुवात केली याची मला कल्पना नाही. परंतु इतक्या वर्षांत जर बेस्टने पाट्या पुन्हा बदलून परत जुनी नावे व्यवहारात आणली नाहीत, तर यापुढे निदान माझ्या हयातीत तरी बेस्ट तसे करेल ही अपेक्षा मी तरी ठेवत नाही. आणि तसे करण्यासाठी बेस्टवर राजकीय दबाव किमानपक्षी सामान्यतः अशा भानगडींत पुढाकार असलेले शिवसेना किंवा तत्सम पक्ष आणतील असे मला तरी वाटत नाही, तेव्हा बेस्ट असे करेलच असे मी तरी खात्रीने म्हणणार नाही.