हपत्ता शोधायचा म्हटलं की असामी असामी मधले पार्ल्याच्या मावशीचा पत्ता शोधणारे धोंडोपंत नक्कीच आठवतात. त्यात रामाचं देऊळ शोधताना "चुक अशी पानाची पिचकारी टाकून - तो राम का खयसंसा तो कोनीकल्डा रे" म्हणणारा घाटी आठवतो..
तो ही असेच म्हणतो - "तुमी असे शीद्दे जा.. शालेपत्तर... मग काय लागेल?... शाला... (वा !)
तसंच वडगाव म्हणजे पुणे जिल्ह्यातलं की नगर..?
असं म्हणणारे मास्तर ही आठवतात..
तसेच खुरमांडीकर वैद्यांचा पत्ता शोधणारे लेखक व 'ठाऊकाय रे, वैद्यबोवा काय पळून जातात... " म्हणणारे कुळकर्णी आठवतात...
प्रत्यक्ष आयुष्यातही अशा अनेक गमती घडतातच..