बृहन्मुंबई आणि त्यापलीकडेही मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा जेथपर्यंत जाते अशा सर्व ठिकाणी एखाद्या उपनगराचे रेल्वेरुळांच्या कोणत्या बाजूला यावरून दोन भाग पाडताना पूर्व आणि पश्चिम यांची व्याख्या नेमकी काय आहे? भौगोलिक पूर्वपश्चिम की बोरीबंदर अथवा चर्चगेटपासून दूर जाणाऱ्या रुळांची दिशा ती उत्तर मानून आणि त्या दिशेने तोंड करून उजवीकडची ती पूर्व आणि डावीकडची ती पश्चिम? कारण यांतली दुसरी व्याख्या मानल्यास मध्य रेल्वेवरील ठाण्यापलीकडील गावांतही (जसे डोंबिवली वगैरे) असाच गोंधळ होऊ शकतो. पण तसा तो झाल्याचे ऐकलेले तरी नाही. (चूभूद्याघ्या. ) त्यामुळे पहिलीच (भौगोलिक) व्याख्या ग्राह्य असावी असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या.)