कारण मुलुंड आणि अंधेरी भिन्न रेल्वेमार्गांवर आहेत.

गावाचे पूर्व आणि पश्चिम हे भाग त्या गावातून जाणाऱ्या रेल्वेरुळांच्या कोणत्या बाजूस गावाचा कोणता भाग आहे यावरून ठरतात. मुलुंड हे मध्य रेल्वेवर आहे तर अंधेरी हे पश्चिम रेल्वेवर आहे. पश्चिम रेल्वेचा मार्ग हा सामान्यतः मध्य रेल्वेच्या मार्गाच्या पश्चिमेस आहे, आणि मध्ये एक सलग भूखंड (किंवा किमानपक्षी जोडणारा रस्ता) आहे. तेव्हा मुलुंड पश्चिमवरून निघून रेल्वेरूळ न ओलांडता अंधेरी पूर्वेस पोहोचणे शक्य असावयास काहीच हरकत नसावी.

(पण हे खरेच शक्य आहे का? वाटेत हार्बरलाइनीचे किंवा मुंबई पोर्टट्रस्ट रेल्वेचे रूळ कोठेच लागत नाहीत का? नक्की आठवत नाही. आणि पश्चिम रेल्वेवरील तितक्या उत्तरेकडील उपनगरे आणि मध्य रेल्वेवरील तितक्या उत्तरेकडील उपनगरे यांना जोडणारे नेमके किती रस्ते आहेत आणि त्यांपैकी कोणत्या रस्त्यांवर वाटेत हार्बरलाईन किंवा मुंपोट्र रेल्वेचे रूळ लागतात किंवा लागत नाहीत हे नक्की आठवत नाही. दोन रस्ते आठवतात ते म्हणजे जनरल वैद्य मार्ग उपाख्य गोरेगाव-मुलुंड लिंक रस्ता आणि अंधेरी कुर्ला महामार्ग. आणि पवईवरून जाणारा रस्ता कोठला? नक्की तपशील माहीत नाहीत अथवा आठवत नाहीत, तेव्हा चूभूद्याघ्या. )

व्यत्यासाने मुलुंड पश्चिम ते अंधेरी पश्चिम असे जाताना मात्र रेल्वे रूळ ओलांडावे लागतात.

(असो. विनोद लक्षात आला. )