शक्यता पहिली...
सरदार बळवंत मेहेंदळे १७६१ च्या पानिपत युद्धात सदाशिवराव भाऊंसोबत लढले. तेथेच त्यांना वीरमरण आले. त्यांच्या नावावरून ह्या चौकाला आप्पा बळवंत चौक असे नाव दिले असावे. प्रभात टॉकीज समोर त्यांचा मेहेंदळे वाडा सुद्धा आहे.
आता हे आप्पा कुठून आले ते माहित नाही. तो बळवंतांचा मुलगा होता आणि त्याने ह्या संदर्भात काही विशेष काम केले म्हणून त्याचे नाव चौकाला दिले आहे किंवा कसे? याबाबत माहिती नाही.
शक्यता दुसरी...
डॉ. आनंदीबाई जोशी त्यांच्या शेवटच्या काळात पुण्यातच वास्तव्यास होत्या. तेव्हा त्यांना औषध पाणी करण्यास एका वैद्य मेहेंदळ्यांनी, त्या विलायतेस जाऊन आल्या असल्यामुळे नकार दिला होता. त्यांच्या नावावरून ह्या चौकाला हे नाव पडले असावे. त्यांचे नाव आप्पा बळवंत होते किंवा काय ते माहिती नाही. ह्या शक्यतेत मला फारसे तथ्य वाटत नाही.
पुण्यातला पहिला एटी फिट रोड जंगली महाराज रोड आणि दुसरा शास्त्री रोड आहे.
शुद्ध मराठी यांस,
आईकडून असो किंवा मम्मीकडून, माहिती असणे आणि नसेल तर माहित करून घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे वाटते.
अजून सेनापती बापट रस्ता आणि कुमठेकर रस्त्याबाबतचे अज्ञान दूर झालेले नाही.
कुमठेकर रस्त्याचे नाव रा. ग. कुमठेकरांवरून पडले आहे. हे ह्या सच्च्या पुणेकरांस ठाऊक आहे. मात्र रा. ग. ही त्यांची आद्याक्षरे आहेत की रा. म्हणजे रावसाहेब आहे हे माहित नाही आणि कुमठेकरांच्या कर्तृत्त्वाबाबतही माहिती नाही.