प्रिया बापट विषयी माझं काही म्हणणं नव्हतं. ती सुंदर (आणि बरीचशी सोज्वळ) नक्कीच आहे. परंतु मी कोळी नृत्य, त्याचं सादरीकरण व लक्षात न राहणाऱ्या गीताचे बोल ह्या विषयी मत मांडलं होतं. तो नाच अगदी छोट्या स्टेजवर (कसाबसा)उरकला असल्यामुळे नाचातील विविध मुवमेंट दाखवायच्या राहून गेल्या. संगीत ही बरच कर्कश होतं. कोळीगीत हा असा गीत व नृत्य प्रकार आहे की नुसतं सुरवात झाली की ताल धरायलाच हवा. ते जमलं नाही असं म्हणायचं होतं.