हे गाणे ऐकले असता ते तितकेसे कर्कश वाटले नाही. अर्थात या कोळीगीताची प्रवृत्ती ही हृदयनाथ ष्टाईल (डोल डोलतंय वार्यावर टाईप) नसून वेसावकर मंडळी किंवा मला लगीन करायचं टाईप आधुनिक कोळीगीताची आहे. प्रथमदर्शनी हे गीत कॅची वाटले नाही तरी एकदोनदा ऐकल्यावर गीताचे बोल लक्षात राहत नाहीत हे म्हणणेही पटण्यासारखे नाही. त्याचबरोबर या गाण्यात विविध मूवमेंट दाखवायच्या राहून गेल्या हेही पटले नाही.
येथे
गाण्याचे ट्रेलर पाहावयास मिळेल. त्यात नाचातील आवश्यक त्या मूवमेंट दाखवल्या आहेत असे वाटते.
फक्त नटीकडेच किली वेळ पाहणार ह्या मुद्द्याला काय उत्तर देणार? अहो आख्खा स्वदेश सिनेमा नटीकडेच बघत पूर्ण केला. खी खी खी.