मलाही १९५७ च्या निवडणुकींचा काळ आठवतो. त्यावेळी मी सहाव्या इयत्तेत होतो. आमच्या घरासमोरच्या भिंतीवर भले मोठे काँग्रेसचे निवडणूक रंगवले होते. त्यावेळी बैलजोडी हे काँग्रेसचे चिन्ह होते. मतदानाच्या दिवशी माझी आई ठेवणीतली साडॅए नेसून आणि देवाला नमस्कार करून मतदानाला गेल्याचे मला ठळकपणे आठवते. इतका त्यावेळी मतदानाला मान होता.