असे काही होण्याची शक्यता कमीच आहे. कारण मुंबईकर होण्यासाठी मुंबईचा अभिमान वगैरे असण्याची गरज नाही हे पुलंनीच सांगून ठेवलेले आहे. (मुंबईला कोणी एक भिकार म्हणत असेल तर आपण सात भिकार म्हणून मोकळे व्हावे हेही आहेच.) त्यामुळे पुण्यातून कितीही दुंदुभ्या वाजल्या तरी मुंबईतून काही हालचाल होईलसे वाटत नाही.