मी मुंबईचा म्हणून मुंबईच्या बाजूने बोलतो आहे असे नव्हे. पण निरपेक्षपणे विचार केला आणि आत्ताची परिस्थिती लक्षांत घेतली तर मला वाटते ते असे :-
फायदेः -
मुंबईत लोड शेडिंग नाही. व्होल्टेज कमीजास्त होत नाही त्यामुळे कुठल्याही विद्युत उपकरणाला स्टॅबिलायझर लागत नाही.
मराविम च्या गैरकारभाराचा त्रास होत नाही.
स्वतःचे वाहन आवश्यक नाही कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला आहे.
फोनवरून बरीचशी कामे होतात. वाणसामानापासून हॉटेलिंग पर्यंत घरबसल्या सुविधा आहे.
दुकाने सकाळपासून रात्रीपर्यंत उघडी असतात. वामकुक्षीसाठी कोणी घरी जात नाही.
सगळ्या गोष्टी सर्वत्र मिळतात, अमुक वस्तुसाठी शनिपार, बुधवार, अप्पा बळवंत चौक असे धावावे लागत नाही.
रहदारीचे नियम बऱ्यापैकी पाळले जातात.
उन्हाळ्यात सुद्धा घरी पंख्याखाली बसलात तर उकडत नाही.
काही बाबतीत महागाई पुण्यापेक्षा कमी आहे, पुण्यातल्यापेक्षा मुंबईतले रिक्शांचे दर कमी आहेत.
तोटे :- हवा वाईट आहे.
गर्दी अतोनात आहे.
मराठीपणा कमी आहे.
अंतरे फार आहेत.
हल्लीच्या परिस्थितीत, सुरक्षा, तुलनेने कमी आहे.