माझ्या कल्पनेप्रमाणे आतपर्यंत वापरल्या गेलेल्या घोषणांपैकी सर्वोत्कृष्ट मराठी घोषणा म्हणजे
नका विसरू - गाय वासरू!
पूर्णपणे मराठी धाटणीची घोषणा. अगदी कमी शब्द. शब्द इतके सोपे की अक्षरशः चार पाच वर्षांच्या मुलालाही घोषणा एकदा ऐकून तोंडपाठ व्हावी. शिवाय यमक नेमक्या महत्त्वाच्या शब्दावर जुळवलेले, त्यामुळे ती अशीच्या अशी दुसऱ्या कोणालाही वापरता येणे कधीही शक्य नाही. मला ही फारच सुरेख घोषणा वाटली.
(इंदिरा काँग्रेसची खूण गाय वासरू अशी होती. ) तेव्हा काँग्रेसचे दोन भाग झाले होते. त्यामुळे आधीचे बैलजोडी चिन्ह गोठवले होते आणि इंदिरा काँग्रेसने त्याला तोडीस तोड गाय-वासरू हे चिन्ह मिळवले! (सिंडिकेट काँग्रेसचे चिन्ह सूत कातणारी महिला असे काहीसे होते) चू. भू. द्या. घ्या.