पूर्णपणे मराठी धाटणीची घोषणा. अगदी कमी शब्द. शब्द इतके सोपे की अक्षरशः चार पाच वर्षांच्या मुलालाही घोषणा एकदा ऐकून तोंडपाठ व्हावी. शिवाय यमक नेमक्या महत्त्वाच्या शब्दावर जुळवलेले, त्यामुळे ती अशीच्या अशी दुसऱ्या कोणालाही वापरता येणे कधीही शक्य नाही. मला ही फारच सुरेख घोषणा वाटली.

अगदी. ही घोषणा मला "गाय वासरू नका विसरू !" अशी आठवते. नंतरच्या "ताई बाई अक्का, विचार करा पक्का, पंजावर/कमळावर मारा शिक्का" ही मराठी घोषणाही आठवते. "आवाज कुणाचा .."ही.