... म्हणजे मी स्वतः ऐकलेला नाही (बहुधा माझ्या जन्मापूर्वीची गोष्ट असू शकेल, पण नक्की खात्री नाही.), पण मौखिक परंपरेने माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. तपशील अंधुक आहेत आणि तपशिलाच्या बारीकसारीक चुकाही असू शकतील. जाणकारांनी त्यांवर अवश्य प्रकाश टाकावा.

डिस्क्लेमर: किस्सा काहीसा अश्लील आहे, परंतु प्रत्यक्षात घडलेला आहे असे समजते. या कारणास्तव खाली पांढऱ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या अक्षरांत दिलेला आहे. गरजूंनी खालील मोकळ्या जागेतील मजकूर उंदराची कळ दाबून निवडून स्वतःच्या जबाबदारीवर वाचावा.

पुण्यात (अर्थातच! इतरत्र कुठे?) झालेल्या एका निवडणूक प्रचारसभेत एका मान्यवर सद्गृहस्थांनी भाषण करताना विरोधात उभ्या असलेल्या'नागरी आघाडी' या पक्ष/युती/जे-काही-असेल-ते-बद्दल पुढील प्रकारचे विधान केले होते (शब्दांत थोडा फेरफार असू शकेल, पण आशय मात्रनिश्चित पुढीलप्रमाणे होता.):

'अरे, ही कसली नागरी आघाडी? ही नागरीही नाही आणि आघाडीही नाही. ही तर नागडी पिछाडी आहे - द्या ठोकून! '

वरील किश्श्यातील 'नागरी आघाडी' या पक्ष/युतीबद्दल आणि वरील विधान कोणत्या मान्यवर सद्गृहस्थांनी कोणत्या निवडणुकीच्या वेळी केले होते याबद्दल किंवा एकंदरच किश्श्याच्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल जाणकारांनी भाष्य केल्यास आभारी राहीन.