तुमची गोष्ट उत्कंठावर्धक आहे आणि संवाद ओघवते आहेत ह्यात प्रश्नच नाही. पण मला एक किरकोळ उणीव वाटते. अर्थात मी तज्ञ नाही. माझे चुकले तर सांगावे.

गाडीत सीडी प्लेअरवर भीमसेनजी मुलतानीतली ठुमरी आळवत होते... "सजन तुम काहेको नेहा लगाए... ".

काहेको नेहा लगाए ही ठुमरी पंडितजींनी तिलंगमध्ये गायली आहे अशी माझी माहिती आहे

येथे ऐकावी

अर्थात तशीच दुसरी कुठली ठुमरी असेल किंवा हीच मुलतानीतही प्रसिद्ध असेल तर माहित नाही. चूभूद्याघ्या.