सध्या प्रचलित असलेली "आला रे आला.... पंजा आला" ही घोषणाही सोपी आहे. कमळ, धनुष्यबाण, वगैरे शब्द वापरुन तयार केलेल्या अशा धाटणीच्या घोषणांमध्ये तो पंच नाही. विशेषतः ट्रकच्या टपावर बसून ढोल ताशे वाजवत जोरजोरात अशा घोषणा देणारे काँग्रेसचे कार्यकर्ते योग्य यती वगैरे पाळून उत्तम घोषणाबाजी करतात असे वाटते.