असली तरी तो पुण्यापुरता मर्यादित पक्ष असावा असे वाटते. या संबंधात एक किस्सा  आठवतो. १९८० च्या निवडणुकीत भाजपचे (त्यावेळचा जनता पक्ष) श्री. अण्णा जोशी विधानसभा निवडणुकीत पडले. लगेच  झालेल्या महानगरपालिका निवडणुकीला शुक्रवार पेठेच्या वॉर्डामधून उभे राहिले. कार्यकर्त्यांनी त्यांना समजावले" अण्णा जर महानगरपालिकेलासुद्धा तुम्हीच उभे राहिलात तर नव्या कार्यकर्त्यांना संधी कशी मिळणार? " अण्णा म्हणाले "मी उभा राहणारच. ज्याला काम करायचे नसेल त्याने करू नये. " पुढे नागरी संघटनेचे डॉ. सतीश देसाई आणि अण्णा जोशी यांच्यात सरळ लढत झाली आणि सतीश देसाई निवडून आले. अण्णा जोशींचे गर्वहरण झाले.

त्यावेळची सतीश देसाईंची मिरवणूक भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्या कमलाबाई खैरे (ज्यांना तिकीट द्यावे अशी कार्यकर्त्यांची मागणी होती) यांच्या घरासमोर आल्यावर खैरेबाईंनी त्यांना ओवाळले यावरून त्यावेळी कार्यकर्त्यांची नाराजी किती असेल याचा अंदाज येतो.