आणि नंतर 'भारतीय जनता पक्ष' या नावाने जनता पक्षातून फुटला.

मोरारजी सरकारात परराष्ट्रमंत्री असलेले अटलबिहारी वाजपेयी जनसंघाचेच.

(मोरारजी सरकारात परराष्ट्रमंत्री असताना वाजपेयींचे इतके परराष्ट्रदौरे होत की 'ते सदैव परराष्ट्रांत असतात म्हणूनच त्यांना परराष्ट्रमंत्री म्हणतात' असे आर. के. लक्ष्मण यांचे व्यंगचित्र तत्कालीन टाइम्स ऑफ इंडियामध्ये आले होते. )

शेकाप हा जनता पक्षाचा भाग किंवा घटक पक्ष कधीच नव्हता. शेकापची जनता पक्षाबरोबर केवळ निवडणूकयुती होती.

जनता दल हा पक्ष आधी (जनता पक्षाच्या स्थापनेच्या वेळेस) अस्तित्वात नव्हता. जनता पक्ष फुटल्यावर त्यातील काही घटक (विकीवरून तपासले असता जनता पक्षातील लोकदल-घटक) आणि राजीव गांधींच्या काँग्रेसपासून फारकत घेतलेले विश्वनाथ प्रतापसिंह आणि त्यांचे अनुयायी यांनी मिळून तो बऱ्याच नंतर स्थापन केला.