मुंबई ही तरुणांसाठी, स्वप्न पाहणाऱ्यांसाठी, स्वप्नांच्या मागे बेफाम धावणाऱ्यांसाठी आहे. नशीब चमकलं कि मुंबई खूप छान आहे. मुंबई खूप झापाट्याने बदलत असते. तो बदलाचा वेग थक्क करणारा, व काहीसा थकवणारा आहे.

मुंबईबाहेर इंदोर व रतलामला माझं राहणं झालं होतं तेव्हा पासून मला स्वत:ला मुंबईपेक्षा इंदोर बरे वाटते. इंदोरला ही लोडशेडींग असते. परंतु तेथील मंडळी त्या विषयी कूरकूर करताना कधीही दिसली नाहीत. उलटपक्षी अशावेळी तेथील बैठ्या घरांच्या गच्चीवर/ छतावर पत्ते, अंताक्षरी खेळताना मी पाहीली आहेत.

महत्त्वाकांक्षी नसलेल्यासांठी आपले उपजिवीकेचे साधन, कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरीवार जवळ असतील तर महानगरांपेक्षा अशी छोटी शहरेच दर्जेदार व आनंदी जीवन जगण्यास योग्य वाटतात.