न्युटनचा सिद्धांत आहे, जो पर्यंत एखादी बाह्य शक्ती चालना देत नाही वा अडथळा आणित नाही तोपर्यंत जी वस्तू गतिमान आहे ती गतिमानच राहते वा जी स्थिर आहे ती स्थिरच राहते.

मला हा नियम उगीचच नियतीचं अस्तित्व असल्याच ठामपणे सांगणारा वाटतो.

वर सांगितलेले उदाहरण आपण समोर घेतले तर जोपर्यंत नियती ला वाटतं की विनयने त्याच्या इच्छेनुसार काम करू नये. तोपर्यंत विनयचा साहेब त्याच्याशी तसाच वागणार. व जेंव्हा नियतीला वाटतं की विनयने आता स्वनियंत्रणाने काम करावे तेव्हा काही वेगळ्या घटना घडून तशा गोष्टी वास्तवात येवू शकतात. विनय सारख्या आळशी माणसावर जबाबदाऱ्या कोसळवून, स्वतःच्या इच्छेने काम करताना अनेक जबाबदाऱ्यांच पालनही करायचं असतं, हे शिकणं भाग पाडलं जातं.