गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये हे सर्रास चालते. गायक गायिकांना भरपूऱ टाळ्या पडत असल्या तरी वादकांना (तितक्या) टाळ्या पडत नाहीत म्हणून बऱ्याचदा सुत्रधार 'वादकांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत' अश्या टाळ्या मागून घेतात. त्याच्य धर्तीवर पल्लवीताईं टाळ्यांचा जोगवा मागायला सुरुवात केली असावी.

एकंदरीतच पल्लवी जोशी ह्यांचे सुत्रसंचाल (तीच तीच) ५-६ वाक्ये पुन्हा पुन्हा म्हण्ण्यात संपून जाते, मग वेळ मारून न्यायला हा टाळ्यांचा सोहळा घडतो. पल्लवी ताईंनी थोडा घरचा अभ्यास करून कार्यक्रमासाठी  तयारी करून स्क्रिप्ट बनवले तर लोकांना टाळ्या  वाजवायचे कष्ट कमी होतील असे वाटते.