माझे बरेचसे मित्र (पुण्यातले) हे कामानिमित्त मुंबई मध्ये होते. त्यांना तरी मुंबईचं जीवनमान फारच आवडलं होतं बुवा. त्यामुळे मुंबई ची जादू काही न्यारीच असणार ह्यात शंका नाही...

माझं एक निरिक्षण अस आहे की, पुण्यातले लोक शब्दांना/ भाषेला खूप महत्त्व देतात. तसे मुंबई मध्ये शब्दांपेक्षा त्या शब्दांमागच्या भावनेला जास्त महत्त्व देतात (अमेरिके सारखंच). मला तरी ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटते. लोकं एकमेकांना उगाचच शब्दात पकडत नाहीत.

पुण्यातही हल्ली सगळ्या गोष्टी सगळीकडे मिळतात, नाही का... पुण्याच्या बाजूने बोलायचं झालं तर माझा असा अनुभव आहे कि चोखंदळपणामुळे असेल कदाचित, पण पुण्यातले लोक जास्त स्मार्ट वाटतात. माझे हे विधान बऱ्याच लोकांना पटणार नाही. पण सारासार विचार करण्यासाठी जे एक बौद्धिक अधिष्ठान लागते ते पुण्यातल्या लोकांकडे जास्त असते असे वाटते.

मुंबई करियर साठी उत्कृष्ठ आहे अस वाटत, लोक बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे जॉब करतात. खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या असल्यामुळे बऱ्याच संधी उपलब्ध असतात.