ये बात है!
प्रकटन अतिशयच आवडले.
( पुण्यात चपला-बुटांची दुकाने हल्ली साड्यांच्या दुकानांपेक्षाही मोठी असतात आणि त्यांना 'शहराचे भूषण' अशीही बिरुदावली मिळालेली आहे!  इतके दिवस पुण्यातलं सरकता एकच जिना [तोही फक्त चढायला वापरता येईल असा. मोजून पायऱ्या बारा] असलेलं चार  पडद्यांचं चित्रपटगृह हेच शहराचे भूषण आहे असे आम्हांस वाटत होते, पण अलिकडे [ लोकांच्या गळ्यात ] जोडे मारणे हे शहराचे नवीन आणि मुख्य भूषण झालेले पाहून जुन्या शालजोडी संस्कृतीचे हे आधुनिक मॅनिफेस्टेशन झाले आहे हे लक्षात आले आणि आमच्यासारख्या हाडाच्या पुणेकरांना जाज्ज्वल्य अभिमान वाटला हे नमूद करावेसे वाटते  

दस्तुरखुद्द आमच्याच जोड्यांच्या जोडांची संख्या डझनाची मर्यादा ओलांडून पुढे चालली आहे हे परवाच आमच्या मातुःश्रींनी लक्षात आणून दिल्यामुळे त्यातले नेहमी घातले न जाणारे जोडे असेच कुणाला तरी मारून खपवावे आणि थोडीफार कीर्ती कमवावी अशा विचारात आहोत! इच्छुकांनी संपर्क साधावा!!)

--अदिती