तुमचं म्हणणं मान्य! मी ही या विषयातला तज्ञ नाही आणि चूक माझ्याकडे असण्याची शक्यताच जास्त, कारण लिहिण्याच्या ओघात जसं आठवलं तसं मी लिहून टाकलं.  त्यामुळे मी लिहिलेलं बरोबरच आहे असा माझा अजिबात दावा नाही.  दुसरी गोष्ट म्हणजे या कथेत पुढच्या भागांमध्येही शास्त्रीय संगीताचे काही संदर्भ आले आहेत.  हे संदर्भ वापरताना राग आणि दिवसाची विशिष्ट वेळ यांच्या तारतम्याला मी (बोलांपेक्षा) जास्त महत्त्व दिलं होतं, कारण कथेच्या नायकाला शास्त्रीय संगीताची आवड/जाण असेल तर दिवसाच्या विशिष्ट वेळेला विशिष्टच राग तो ऐकेल असा मी विचार केला होता.  त्यामुळे 'काहेको नेहा लगाए' हे बोल मुलतानीतलेच आहेत की नाहीत हे मी खातरजमा करून घेतलं नाही, फक्त मुलतानी हा टळत्या दुपारचा किंवा संध्याकाळचा राग आहे एवढीच काळजी घेतली होती.  क्षमस्व! आणि आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद!