त्या पत्रकाराला खरोखरच बूट मारायचा नव्हता असं तो स्वत: ही नंतर म्हणाला. परंतु कॉंग्रेस पक्षाच वागणं, बोलणं दिवसेंदिवस निगरगट्ट व बेफिकरीचे होत आहे. राजकारणात सत्तेत असताना चूकिचे निर्णय घेतले की त्याची परीणती जीव गमावण्यात होते' हे इंदिरा गांधी, राजीव गांधी ह्यांची उदाहरणे कॉंग्रेस विसरत आहे. त्यांना ते आठवावे म्हणूनच ही कृती घडली नसेल ना? अशी मला शंका वाटते. बूट उडवणारा ( फेकणारा नव्हे) ह्याच्या हातून ती कृती काळाच्या पाउलांची दिशा दाखविण्यासाठी नियतीनेच घडवून घेतली असावी.

पादत्राणे ह्या शब्दापेक्षा पायताण हा शब्द सोपा असून शहरी भागातही तो प्रचलित व्ह्यायला हरकत नाही.