गदिमांना गीतकार म्हणून हिणवले असे मी पण ऐकले आहे. पण गदिमा मला स्वतःला सुद्धा ( मी तसे ऐकले आहे म्हणून म्हणत नाही ) एक गीतकारच वाटतात.
वरील कवितेतील एकच ओळ पहाः
गिऱ्हाईकाच्या लहरीखातर...
गीत व काव्य यातील माझ्यामते असलेला फरक -
गीत म्हणजे गद्यरुपातील विचारांना / भावनांना सुंदर, सुबक असे पद्यरूप देणे.
( यात सौंदर्य, शब्दांची निवड, गेयता, ठेका, लय, वर्णनात्मकता, मोहकता यांच्यावर भर असणे महत्त्वाचे ठरावे. )
काव्य म्हणजे आत्माविष्काराची वस्तुनिष्ठ नवनिर्मीती!
गीतरामायण हा आत्माविष्कार नव्हे. ती कथा ( रामायण ) शतकानुशतके ऐकली जात आहे. तिला गीतरूप देण्याचे काम झाले.
( माझ्यामते पुरेसा वेळ दिला व व्यावसायिक यशाची खात्री आहे असे वाटले तर याच स्थळावरील अनेक प्रतिभावान कवी गीतमहाभारत रचू शकतील.)
कवीची कवीशी तुलना करण्याचा छंद आहे असे कृपया समजू नयेत, पण वरील कवितेच्या समोर स्व. भटांच्या काही ओळी ठेवा.
कधीच हाक तुझी हाय ऐकली नाही
अखेर मीच पुन्हा पाहिले वळून मला
विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही
यात मला तरी एक सच्चेपणा जाणवतो. जो त्या कवीच्या स्वतःच्या जीवनात किंवा सभोवतालच्या व्यक्तींच्या जीवनातील अनुभव वाटावा.
'आपल्याला आलेले ( स्वतःच्या वा इतरांच्या बाबतीतले ) अनुभव कथन करणे व त्यातून एक अशी निर्मीती होणे की जी स्वतःलाच अस्वस्थ करते' ते काव्य असे माझे मत आहे.
धन्यवाद!