हे लिखाण आत्मा आणि शरीर यांची भुतलावरील यात्रा दर्शवित आहे असे मला वाटते...

"कुठल्यातरी अज्ञात हाताने इशारा केला आणि दोघांनीही चालायला सुरुवात केली. "
 
यातील अज्ञात हात म्हणजे विश्वनियंत्याचा हात असावा.

पण पुढील वाक्य वरच्या विधानाला पूरक नाही...

"प्रत्येकाचा मार्ग निर्विकार निराळा होता, पण एकत्र येऊ नये असेही बंधन त्या मार्गांवर नव्हते. " कारण आत्मा आणि शरीर एकत्रच असतात.

त्यामुळे माझ्यापुढे मोठ्ठं ????

"सूर्य गोते खात राहिला.

ज्या निरर्थकपणे त्यांनी चालायला सुरुवात केली होती तसेच ते अचानक थांबले.

सुरुवातीच्या जागेपासून ते रेसभरदेखिल ढळले नव्हते."

म्हणजे त्यांची यात्रा जिथून सुरू झाली तिथेच ती संपली......

चौकसजी तुमचे लिखाण आवडले... पण थोडासा खुलासा केल्यास बरे होईल.....:)