मला वाटते पत्ता सांगण्याची किंवा पत्रात लिहिण्याची एक निश्चित पद्धत असायला हवी. तशी ती असतेही. पत्रात लिहायचा पत्ता एका निश्चित पद्धतीनेच लिहिला जातो. तो सांगतानाही तसाच सांगितला तरी चालू शकेल. मी स्वतः पत्ता मागताना 'पोस्टल ऍड्रेस' द्या असेच सांगतो. त्या बरोबर मोबाईल किंवा फोन नं घेतला की काम भागू शकेल.