हासणाऱ्या माणसाकडे इतर माणसे ( जर हासणारा पुरुष असेल तर विशेषकरून स्त्रिया ) ताबडतोब आकर्षित झाल्याचे अनेक दाखले आहेत. ( ज्यांना 'एखाद्या गोष्टीवर का हसावे' हेच समजत नाही ते हासणाऱ्याकडे आकर्षित होणारच असा 'स्त्रियांबाबतचा' एक सिद्धांत पुर्वी वाचल्याचे आत्ता मलाही या निमित्ताने आठवले, ही एक वेगळीच गोष्ट! ) ते आकर्षित झाल्यानंतर काय काय झाले याचे फारसे दाखले नसावेत. दोघेही आयुष्यभर हासत बसले असावेत, स्वतंत्रपणे!
दुसऱ्या माणसाला आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी हसणे हा गुण निसर्गाकडून आपल्याला 'उपजत' मिळालेला आहे. अगदी लहान अर्भकेसुद्धा हसतात ती ह्या आकर्षणाच्या इच्छेनेच असे कोठेतरी वैज्ञानिक लेखांत वाचलेले आहे. पुन्हा सापडले तर चिकटवीन इथे.