भूषण, मी अभिमान असावा.. वगैरेचा अट्टाहास करा असं नाही म्हणणार... कारण संभाषण महत्त्वाचं हे मला सुद्धा मान्य आहे.. पण,

१. आपण मराठी का आहोत... कारण आपल्याला मराठी येतं.... उद्या जर मी मराठी बोललोच नाही/ विसरलो तर माझ्या मराठीपणाला काही अर्थ राहील का? माझं असं म्हणण नाही की फक्त मराठी एक्के मराठी करावं... पण जर दोघे मराठी आहेत तर त्यानी बोलावं ना मराठी मधे....

२. आयबीएन लोकमतचं मी दिलेलं उदा. - जर हि मराठी वाहिनी आहे, तर त्यांनी का मराठीचा जास्तीत जास्त वापर करू नये? ती फक्त महाराष्ट्रियन लोकचं बघणार..मराठी लोकांसाठीच आहे ती... मग अमराठी प्रेक्षकाला कळावं म्हणून इंग्रजी वापरायची? ज्याला मराठी समजतच नाही तो कशाला बघेल हि वाहिनी?

३. जर मराठी भाषा शब्द तुम्ही मी नाही वापरले तर कदाचीत ते विसरून जातील.... मग काही पिढ्यांनंतर मराठी पण विसरून जाईल... ( फार फार पिढ्यांनंतर, आणि वापर कमी होत गेला प्रत्येक पिढीमागे तर... ) आज संस्कृत आहे का  वापरात?

४. काही मते अशीही असतील कि, विसरलो मी मराठी तर कितीसा फरक पडणार आहे? जर मला मराठी नाहीच आलं तर मग मी मराठी कसा राहीन...?

५. माझा अनुभव... माझा मित्र तेलगू आहे.. पण लहानपणापासून वडिलांच्या हट्टामुळे घरी सुद्धा इंग्लिश मधून बोलणं... त्यामुळे त्याला तेलगू नाही येत... त्यामुळे तो फक्त नावापुरता तेलगू आहे...

६. जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीज, तमिळ, तेलगु, गुजराती... सगळ्यांना जर त्यांच्या भाषांचा अभिमान आहे तर मग मराठी माणुस का उदासीन दिसतो? काहीतरी कारण असावे...