ज्याला मुदलातली सेल्फफुल्फिलिंग प्रॉफेसी ही भानगड काय आहे ते मुळात माहीत नाही, त्याला सेल्फफुल्फिलिंग प्रॉफेसी म्हटले काय किंवा आत्मसमर्थक प्रतिपादन म्हटले काय, सारखेच डोक्यावरून जाणार. उलटपक्षी ज्याला सेल्फफुल्फिलिंग प्रॉफेसी म्हणजे काय ते माहीत आहे अशाने ती कल्पना मुळात सेल्फफुल्फिलिंग प्रॉफेसी या इंग्रजी नावानेच ऐकलेली असण्याची आणि अशी व्यक्ती त्याचा उल्लेख जाणकारसमूहांत सेल्फफुल्फिलिंग प्रॉफेसी या इंग्रजी नावानेच करण्याची शक्यता अधिक.

अशा व्यक्तीपुढे आत्मसमर्थक प्रतिपादन हा शब्द उच्चारला असता उच्चारणारास नेमके काय म्हणायचे आहे ते चटकन लक्षात येणार नाही. अर्थात, 'आत्मसमर्थक प्रतिपादन म्हणजे सेल्फफुल्फिलिंग प्रॉफेसी' असे समजावून सांगितल्यावर शब्दांची फोड करून तो या दोन नावांमधला संबंध लावून शकेल, पण ते घटनेनंतरचे शहाणपण झाले.

मराठी समजणाऱ्या माणसाला चटकन समजावे म्हणूनच जर मराठीकरण करायचे असेल, तर 'स्वतःला खरे करणारे भाकित' किंवा 'स्वतःचेच खरे करून दाखवणारी बत्तिशी' असे काही म्हटले तर कसे?