अनिर्णीत म्हंटले तर कळेलच असे नाही???
हे विधान न पटण्यासारखे आहे. वर्तमानपत्रांतून अनिर्णीत हा शब्द शेकडो वेळा वाचला जातो. मराठी वृत्तपत्रे ड्रॉ कधीच लिहिणार नाहीत. खेड्यापाड्यातली माणसे ड्रॉ शब्द वापरताना आढळणारच नाहीत. ज्यांना इंग्रजी फारसे ऐकायला मिळत नाही आणि जे फक्त मराठीतले लिखाण वाचतात ते अनिर्णीतच म्हणतात.
आपल्या सुदैवाने, क्रिकेटमधल्या अनेक संज्ञा--चौकार, षट्कार, (निर्धाव) षटक, खेळपट्टी, गोलंदाज, फलंदाज, यष्टिचीत, (झेल)बाद, पायचीत, धावबाद, चेंडू सीमापार जाणे, चषक, करंडक, ढाल, सामनावीर, कसोटी, मालिका हे शब्द मराठीत वापरून वापरून इतके गुळगुळीत झाले आहेत की यांपेक्षा वेगळा शब्द कानावर पडला किंवा वाचावा लागला की कसेसेच होते.
आता आय्बीएन लोकमतविषयी. या वाहिनीवर बातमीच्या चलपट्ट्यांपैकी(टिकर टेप) निदान निम्म्या पट्ट्यांवर मराठीची एकतरी चूक असतेच. स्वतः निखिल वागळे मराठीचे अशुद्ध उच्चार करतात. लोक-मतचा उच्चार ते लोक्मत करतात. पुन्हाचा पुन्न्हा, गुन्हाचा गुन्न्हा, जनताचा जन्ता, पारंपरिकचा पारंपारिक वगैरे. अशा वाहिनीवर याहून चांगले मराठी काय मिळणार?