काढल्याने माप कोणाचे असे...
उंच का होई खुजेपण आपले?

जायची तर रात्र जा विसरून ती...
चांदणे स्मरशील ना पण आपले?

थेट कोणीही घुसे परका इथे...
राहिले आता न अंगण आपले!

मान्य की, मोठीच ही पृथ्वी तशी...
फार छोटे, फार, रिंगण आपले!                         
.... उत्तम ! प्रदीपजी, अपेक्षेप्रमाणे सुरेख गझल.