आत्मसमर्थक प्रतिपादन ह्या शब्दयुग्माचा अर्थ समजण्यासाठी सेल्फ़फ़ुलफ़िलिंग प्रोफ़ेसी ही काय संकल्पना आहे हे माहीत असण्याची अजिबात गरज नाही. आत्म म्हणजे स्वत:, समर्थन म्हणजे पुरस्कार-पुष्टी देणे-घोडे पुढे दामटणे, अनुमोदन, दुजोरा, तळी उचलणे, बाजू घेणे इत्यादी आणि प्रतिपादन म्हणजे निवेदन, उपपादन, विवेचन, शब्दिक मांडणी, युक्तिवाद वगैरे.. ह्या गोष्टी सामान्य माणसाला माहीत असतात. त्यामुळे आत्मसमर्थक प्रतिपादन हे शब्द उच्चारताच त्याच्या मनात त्या शब्दांपासून जो बोध व्हायला पाहिजे तो होणारच. उलट, इंग्रजी शब्द वापरले तर अर्थाची जुळवाजुळव करेपर्यंत बराच वेळ जाणार.