भूषणजी, आपले मत वाचले...

ज्या ग. दि. मांच्या पायाजवळ उभं राहण्याचीही आपली (हे मी स्वत:साठी वापरतोय) लायकी नाही, त्यांच्या प्रतिभेबद्दल, ते काव्य की गीत? आणि नक्की कुठले जास्त चांगले अशी तुलना करायचा मूर्खपणा मी तरी करणार नाही.

ज्या स्व. भटांचे तुम्ही उदाहरण दिलेत तेसुद्धा गझलेचे काफिये, आणि रदीफ आधीच लिहून ठेवायचे असे मी ऐकले आहे.

(हे जर सत्य असेल, तर त्यांच्या सगळ्याच गझलांना 'गीत' म्हटले पाहिजे तुमच्या व्याख्येनुसार. )

'आपल्याला आलेले ( स्वतःच्या वा इतरांच्या बाबतीतले ) अनुभव कथन करणे व त्यातून एक अशी निर्मीती होणे की जी स्वतःलाच अस्वस्थ करते' ते काव्य असे माझे मत आहे.

असे तुम्ही म्हणता ना? मग ह्याच जोगिया मधली पहिली कविता वाचा, त्यातलीच 'पुरुषसूक्त' ही कविता वाचा, म्हणजे कळेल तुम्हाला, ग. दि. मांनी टिपलेले, आणि त्यांना अस्वस्थ करणारे जीवनानुभव.  "सच्चेपणा" ची नक्की व्याख्या सांगितलीत तर अजून बरे होईल.