आत्म म्हणजे स्वत:, समर्थन म्हणजे पुरस्कार-पुष्टी देणे-घोडे पुढे दामटणे, अनुमोदन, दुजोरा, तळी उचलणे, बाजू घेणे इत्यादी आणि प्रतिपादन म्हणजे निवेदन, उपपादन, विवेचन, शब्दिक मांडणी, युक्तिवाद वगैरे.. ह्या गोष्टी सामान्य माणसाला माहीत असतात.

या गोष्टी मला माहीत आहेत. (तेवढे 'तळी उचलणे' आणि 'उपपादन' या दोन शब्दांचे अर्थ सोडल्यास. पण ही त्रुटी एखाद्या बऱ्यापैकी शब्दकोशात पाहून दूर करता येऊ शकेल. )

त्यामुळे आत्मसमर्थक प्रतिपादन हे शब्द उच्चारताच त्याच्या मनात त्या शब्दांपासून जो बोध व्हायला पाहिजे तो होणारच.

तरीही माझ्या मनात हे शब्द उच्चारताच जो बोध व्हायला पाहिजे असे अपेक्षित होते तो झाला नाही.

उलट, इंग्रजी शब्द वापरले तर अर्थाची जुळवाजुळव करेपर्यंत बराच वेळ जाणार.

कदाचित ही संकल्पना अगोदर इंग्रजीतून अनेकदा ऐकल्याने असेल, परंतु इंग्रजी शब्द वापरताक्षणी लगेच उलगडा झाला. आणि त्यानंतर मग 'आत्मसमर्थक प्रतिपादन'च्या अर्थाची जुळवाजुळव करता येऊन दोन्ही शब्दसमूहांमधील संबंध पटला.

याचा अर्थ मी असामान्य आहे असा मी घ्यावा काय?