असे केले तर कार्यक्रम अत्यंत नीरस होईल. गाणे थोडे, आणि वटवट जास्त असेल तरच गाणे रंगते.  हा अनुभव आम्ही देवळादेवळांतून चालणार्‍या भजनांच्या कार्यक्रमांमध्ये नेहमी घेतो.  उगाच भजनापाठोपाठ भजने म्हटली की हळूहळू लोक उठून जायला लागतात. तीन मिनिटांच्या भजनाची पार्श्वभूमी सांगायला किमान तितक्याच मिनिटांचे निवेदन असेल तरच पुढे होणारे भजन लोकांना समजते आणि त्यांच्या आठवणीत राहते.