मस म्हणजे मराठी संकेतस्थळे. इथे आम्हाला पाताळविजयममधल्या राक्षसासारखे हसावेसे वाटते. 

 प्रियाली यांचा प्रतिसाद "मसवरील आणखी एक लोकप्रिय विषय. यावर आधी झालेली युद्धे खालीलप्रमाणे" या वाक्याला उद्देशून होता.
मनोगतावर प्रत्येक लेखानंतर ह्यावरून आठवलं असा मथळा आणि पाच लेखांची यादी येते (पहा : कुठलाही लेख). त्या यादीपेक्षा मी केलेली मानवी * 'ह्यावरून आठवलं'ची यादी अधिक सयुक्तिक आहे असे प्रियाली यांचे मत आहे. हुश्श!

हॅम्लेट

*माझ्या प्रतिसादात मानवी हा शब्द नाही पण मी केलेली यादी ही मानवी आहे कारण मी मानव आहे. पण याचा अर्थ माझे नाव मानव आहे असा नाही. (उदा. तालमध्ये अक्षयचे असते तसे. आमचा हिंदी शिणेमाचा व्यासंग नको तिथे उतू जातो. ) माझी जात मानव आहे. (खरे तर मानव ही संज्ञा फारच सामान्य आहे, होमो सेपियन सेपियन म्हणायला हवे.
याला प्रतिशब्द कृपया विचारू नये.)
असे प्रियाली यांना म्हणायचे होते. (पण कंसातले प्रियाली यांना म्हणायचे नव्हते, ते मलाच म्हणायचे होते. किंवा खरेतर प्रियाली यांना यातले काहीच म्हणायचे नसावे असे वाटते, मानवी सोडून. मानवीच्या अर्थासाठी प्रतिसाद परत वाचावा. )