की प्रत्येक खेळापूर्वी प्रमोटरने चित्रपटाला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत असे आवाहन करावे?

नाही.

सुरुवातीच्या भागातल्या झुकझुकगाडीवरच्या मारामारीनंतर, जया भादुरी अमिताभला तिजोरीच्या चाव्या सुपूर्त करते त्यानंतर, गब्बर हातावरच्या मुंगळ्याला प्रतीकात्मक मारतो त्यानंतर, 'कितने आदमी थे' चित्रक्रमा*नंतर (*'सीक्वेन्स' अशा अर्थी), अमिताभ गब्बरच्या डोळ्यांत होळीचा रंग उडवतो त्यानंतर, गब्बर येऊन जया भादुरी आणि घरातला नोकर (रामूचाचा?) वगळता संजीवकुमारच्या तमाम खानदानाला खलास करतो त्यानंतर, 'बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना' नंतर, 'अगर किसी ने हिलने की कोशिश की तो... ' नंतर,  नाण्याचा दोन्ही बाजूंच्या सहाव्या जॉर्ज बादशहाबद्दलच्या गौप्यस्फोटानंतर अशा चित्रपटातल्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगानंतर चित्रफितीतच जी. पी. सिप्पीने जातीने येऊन 'या दृश्याला जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत' असे प्रेक्षकांना आवाहन करावे.