चेंडूफळीचा विषय निघाला आहे त्यावरून खालील शंका आल्या.
चेंडूफळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या इतर शब्दांचे काय? जसे की वेष्टण, अधिक वेष्टण, आखूड अधिक वेष्टण, मध्य बंद, मध्य चालू, बिंदू, वेष्टण बिंदू इ. सचिन जर आगरकरशी बोलत असेल तर त्याने हेच शब्द वापरायला हवेत मग भले सामन्याचा निकाल काही लागो.
असेच भज्जीने पंजाबी, सौरवने बंगाली प्रतिशब्द वापरायला सुरूवात करायला हवी. (का कोण जाणे, बहुतेक पंजाबी शब्द भकारांत असतील असे वाटते.) पण अडचण अशी की भज्जी, सचिन, ढोणी, सौरव यांची बोलणी चालू असतील तर काय करायचे?
दुसरा सोपा उपाय म्हणजे या टोपीकराच्या खेळावर संपूर्ण बहिष्कार टाकून सर्वांना हूतूतू किंवा कबड्डी खेळायला सक्ती करावी. याचाच अर्थ हॉकी, फुटबॉल, सर्व मैदानि खेळ यांच्यावर बहिष्कार हे ओघाने आलेच.
जय महाराष्ट्र.
हॅम्लेट