अशा प्रसंगी 'स्वतःला खरे करणारे भाकित' त्याच कसोटीवर उतरायला काहीच हरकत नसावी असे मला तरी वाटते

सहज समजण्याची अपेक्षा जरी सहज समजण्यासारखी असली (! ) तरी प्रतिशब्द निवडताना तेवढेच पुरेसे होईल असे नाही. मूळ संज्ञा जेथे जेथे ज्या ज्या प्रकारे वापरली गेलेली आहे त्या त्या प्रकारे भाषेचा ओघ न बिघडवता वापरता प्रतिशब्द यायला हवा, असे मला वाटते. .... भाकीत (मोल्स्वर्थ शब्दकोशात की दीर्घ आहे) जरी समजायला सोपा असला तरी ..... प्रोफेसी जेथे जेथे वापरला गेला आहे / जाईल तेथे तेथे तेथे त्या प्रकारे त्या सुलभतेने वापरता येईल का? मराठीतली ..णारा/णारी इत्यादी विशेषणे लिंगसापेक्ष आहेत, त्यांची सामान्यरूपे करावी लागतात. (...णारे भाकीत - ..णाऱ्या भाकितामुळे इ. ... प्रोफेसीवर एखादा लेख लिहावा आणि तितक्या सर्व ठिकाणी ...णारे भाकीत वापरून पाहावे.) त्यामुळे कित्येकदा ती वापरणे अवघड होऊन बसते. तसे संस्कृत विशेषणांचे होत नाही. त्या बाबतीत ती जास्त सोयीस्कर पडतात.