बदलत्या सामान्यरूपांमुळे होणारी लिहिण्याची अडचण समजू शकतो, परंतु मुळात कोणतेही लेखन हे लेखकाच्या लिहिण्याच्या सोयीनुरूप असावे की वाचकाच्या वाचनाच्या सोयीनुरूप, आणि त्याहीपुढे जाऊन लेखकाची लिहिण्याची गरज मोठी (लेखक स्वान्तसुखाय लिहितो) की लेखकाची वाचकाला आपले लेखन समजण्याची गरज मोठी (लेखक वाचकाने वाचून समजावे म्हणून लिहितो) हाही एक मुद्दा राहतोच.
(सेल्फ-एक्स्क्यूझेटरी डिस्क्लेमर अर्थात भविष्यात स्वतःच्या सुटकेसाठी पळवाट: अर्थात, स्वान्तसुखाय लेखनासाठी वाचकाला समजण्या-न-समजण्याचा विचार करण्याची अट नसावीच! )