ही केवळ वाक्ये आहेत, (हृदयद्रावक (? )) प्रसंग नाहीत.
वाक्यावाक्यागणीक जर टाळ्या पडू लागल्या (किवा त्याहूनही वाईट म्हणजे वाक्यावाक्यागणीक टाळ्यांची मागणी होऊ लागली) तर कठीणच होईल.
तशी मग नाणे कडेवर उभे राहणे, 'हम अंग्रेजों के जमाने के जेलर... ' वाला प्रसंग, 'ये रही चाबी, और ये रही पिस्तौल', सूरमा भोपालीवाला प्रसंग, धर्मेंद्रचे 'सुसाट' ('ये अंग्रेज लोग जब मरते हैं तो उसे सुसाट कहते हैं', 'बुढिया चक्की पिसिंग... अँड पिसिंग... अँड पिसिंग...', 'भला मौसीजी से कौन शादी करेगा' आणि 'मौसी भी तैयार, बसंती भी तैयार'सकट) वगैरेवगैरेंची आठवण आम्हालाही झाली होती, पण या सर्वांत 'हृदयद्रावक' असे काही नाही.
आणि इमाम साहब स्वतःच्याच मुलाचा नमाज-ए-जनाजा (किंवा त्याला जे काही म्हणत असतील ते- चूभूद्याघ्या. ) पढतात आणि त्यानंतर शांतपणे नमाजाला मशिदीत जायला निघतात, किंवा त्याच प्रसंगातील संजीवकुमारचे एका गावकऱ्याबरोबरचे अहिंसेबद्दलचे संभाषण वगैरे हृदयद्रावक असले, तरी ते केवळ १. सर्वधर्मसमभाव आणि २. गांधीवादी तत्त्वज्ञान काहीही करून चित्रपटात आणण्यासाठी चित्रपटात घुसडले असावे असे वाटते. (म्हणजे खरे तर टाळ्या झाल्याच पाहिजेत!)