छान विषय मांडला आहे.
खरे आहे अगदी खूप तारांबळ होते घरी असलेल्या स्त्रीची. आणि उच्चशिक्षीत बायको असली तरी नवऱ्याला नोकरी केलेले आवडत नाही म्हणून घरी राहणाऱ्या आजही अनेक आहेत.
H4 मुले तर बरयाच स्त्रीयांना घरी बसावे लागते.H4 असलेल्या आणि नोकरी करायची इच्छा तर आहे, पण घरी बसावे लागते आहे हा तर चर्चेचा एक स्वतंत्र विषय होवू शकतो.
त्या साठी नवराबायको मध्ये समजुतदारपणा हाच उपाय आहे. घरी असते म्हणून तिला सारखे गृहित धरले जाते ते पण योग्य नाही.
कधितरी विषय निघाला की मग हेच नवरोबा म्हणतात एकटाच कमावतो ना मी.
काहीजणी अशाही असतात की योग्य संधी मिळत नाही. मग घरी आहे तर पडेल ती कामे करावी लागतात तेव्हा तिचे मन स्वतालाच खात असते.
नवरा चुकीचा वागतो असे काही नाही पण समजून घेतले पाहिजे तिला पण.